
दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निधीतून उभारण्यात आलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वरूढ भव्य पुतळ्याच्या अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अत्यंत गौरवशाली असून, आपल्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण समाजाच्या स्मरणात कायम राहील याची आम्हाला खात्री आहे.
मात्र या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये एक अत्यंत गंभीर अस्वस्थता आणि संताप व्यक्त केला जात आहे. कारण कंवरसिंग बैनाडे नावाची व्यक्ती, जी पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी, सामाजिक अस्थैर्य निर्माण करणारे वर्तन, महिलांचा अवमान, आणि राजकीय दुरुपयोग यासाठी ओळखली जाते – ती स्वतःला या कार्यक्रमाचा आयोजक म्हणवून घेत आहे. खाली त्याच्या वर्तनाबाबत सविस्तर माहिती अहवाल सादर करीत आहोत: