
लाभ घेण्याचे आ. सौ. श्वेताताई महाले यांचे आवाहन…
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व महसूल मंत्री मा. श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशानुसार महसूल विभागांतर्गत ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी त्वरित निकालात काढणे,तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी मंडळस्तरावर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देशित केले आहे.

त्या अनुषंगानें चिखली तालुक्यातील पालकत्व स्विकारलेल्या एकूण 15 गावांमध्ये शासन निर्णयानुसार, तसेच आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या निर्दशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने निश्चित केलेल्या मानक SOP कार्यप्रणालीतील विषयाप्रमाणे चिखली तालुक्यातील पालकत्व स्विकारलेल्या गावांमध्ये “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरे दि. 04 जून, 2025 रोजी- भानखेड, उदयनगर शेळगांव आटोळ व एकलारा या गांवामध्ये आयोजीत करण्यात आलेले आहे. तसेच दि. 11 जून, 2025 रोजी अमडापुर, धोडप, पेठ व केळवद या गांवामध्ये सकाळी 10.00 ते सायं 05.00 वाजेपर्यंत शिबीर आयोजीत करण्यात आलेले आहे.
तसेच सदर शिबिर आयोजित करतांना मंडळातील सर्व गावांचा सुध्दा समावेश करण्यात आलेला आहे. जेणे करून सदर शिबिरामध्ये मंडळातील सर्व गावातील जास्तीत जास्त नागरीकांना लाभ देता येईल. सदर शिबिरांमध्ये महसूल विभाग व इतर शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ प्रदान करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत शेतकरी व नागरिकांना खालील नमूद योजनांचा लाभ प्रदान करण्यात येणार आहे.
महसूल विभाग
- जिवंत सातबारा मोहीम-मयताचे नाव कमी करून वारस नोंद करणे
- विस्तारित जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत खालील बाबीकरिता अर्ज स्वीकारणे
- अपाक नोंद कमी करणे
- एकुमें/एकुपु नोंद कमी करणे
- तगाई कर्जाच्या नोंदी कमी करणे
- बंडीग बोजे आयटक बोजे
- नजर गहाण/सावकारी कर्ज/सावकारी अवार्ड
- भूसंपादन निवडा व बिनशेती आदेशानुसार कजापचा प्रलंबित अंमल ७/१२ सदरी घेणे
- पोट खराब वर्ग अ खालील क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात रुपांतरीत करून ७/१२ सदरी नोंद घेणे
- नियंत्रित सत्ता प्रकार शेरे प्रकार निहाय पडताळणी करून ७/१२ सदरी नोंद घेणे
- भोगवटादार वर्ग १ व भोगवटादार वर्ग २ असे स्वतंत्रपणे भूधारणा प्रकारनिहाय ७/१२ तयार करणे
- अंतिम निस्तार पत्रकातील स्मशानभूमी व इतर निस्तार हक्काच्या नोंदी अधिकार अभिलेखात घेणे
- महिला वारस नोंदीबाबत
- भोगवटादार वर्ग २ चे भोगवटादार वर्ग १ करणे करिता संबधित शेतकरी यांचे कडून अर्ज स्वीकारणे ३. सलोखा योजना : संमतीने शेतजमीन ताबा अदलाबदल दस्त (exchange deed) करणे अर्ज स्वीकारणे
४. अतिक्रमित शेत रस्ता/शिवार रस्ते/पाणंद रस्ते खुले करणे
५. स्मशानभूमी व दफनभूमी : गाव तिथे स्मशानभूमी दफनभूमी
६. पंतप्रधान आवास योजना व इतर राज्यस्तरीय घरकुल योज़नेतर्गत मंजूर घरकुल यांना ५ ब्रास प्रती घरकुल याप्रमाणे मोफत वाळू उपलब्ध करणेश्च त्याबाबत अर्ज स्वीकारणे
७. PM किसान योजनेंतर्गत पात्र शेतकरी यांचे land seeding करणे
८. नैसर्गिक आपत्ती मध्ये नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांचे eKYC करणे व उर्वरित शेतकरी यांची यादी अपलोड करणे
ई महसूल प्रणाली
१. फेरफार अदालत घेणे प्रलंबित नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार मंजूर करणे
२. डीजीटल स्वाक्षरीत ७/१२ वाटप करणे
३. Agristack अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (farmer ID) तयार करणे
४. ई चावडी अंतर्गत online जमीन महसूल वसुली करणे
५. ई हक्क प्रणाली अंतर्गत अर्ज स्वीकारणे
६. ई पिक पाहणी बाबत पिक पाहणी करणे
७. नवीन आधार नोंदणी व आधीचे आधार अद्यावत करून घेणे
८. उत्पन्न दाखला/जात प्रमाणपत्र/नॉन क्रेमिलेयर प्रमाणपत्र/राष्ट्रीयत्व, वय, अधिवास प्रमाणपत्र शेतकरी दाखला/भूमिहीन दाखला/ऐपत प्रमाणपत्र ई. करीता अर्ज स्वीकारणे
संगायो शाखा
- संजय गांधी/श्रावण बाळ निराधार योजना करिता नवीन अर्ज स्वीकारणे
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ/विधवा/दिव्यांग योजनेकरीता नवीन अर्ज स्वीकारणे
- संजय गांधी निराधार योजनेबाबत eKYC व आधार validation बाबत कार्यवाही करणे
तरी सर्व शेतकरी बांधवांनी,वृद्ध, महिला व विद्यार्थी यांनी”छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये” उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. सौ. श्वेताताई महाले यांनी केले आहे.
अर्जंट महत्वाची आहे
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….
लाभ घेण्याचे आ. सौ. श्वेताताई महाले यांचे आवाहन..
चिखली