नर्मदा विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
: चिखली येथून जवळच असलेल्या मंगरूळ इसरूळ येथील नर्मदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने इयत्ता बारावी व दहावी च्या परीक्षेत निकालाची परंपरा कायम ठेवली असून इयत्ता 12 वि विज्ञान शाखेचा निकाल 99 टक्के लागला असून कला शाखेचा 96 टक्के निकाल लागला आहे तर नुकताच10 वी चा निकाल 100 टक्के लागला असून निकालाची परंपरा कायम ठेवली आहे
नर्मदा विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
नर्मदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मंगरूळ इसरूळ येथील वर्ग 10 वी चे विद्यार्थी परीक्षेला एकूण 59 विद्यार्थी बसले होते पैकी 59 विद्यार्थी पास झाले असून शाळेचा यावर्षीचा 100%निकाल लागला असून त्यापैकी 90% च्या पुढे सहा विद्यार्थी आले असून विशेष प्राविण्य घेऊन 32 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे तर प्रथम श्रेणीमध्ये 14 विद्यार्थी व द्वितीय श्रेणीमध्ये 7 विद्यार्थी असे सर्व 59 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी प्रथम क्रमांक जयेश रमेश शिवणकर 94.80%, द्वितीय क्रमांक साक्षी गणेश सुरोशे 93.20% तर तृतीय क्रमांक साक्षी विनोद वरपे 92.40% गुण घेऊन सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
सर्व विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष श्री सुधाकर रावजी देशमुख साहेब, संस्थेच्या सचिव सौ चंद्रिका ताई एम देशमुख, व संस्थेचे कार्याध्यक्ष श्री आशिषजी एम देशमुख साहेब व विद्यालयाचे प्राचार्य श्री आर एस पटेल सर व सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.