बालाजी अर्बनला दिलेल्या धनादेश अनादर प्रकरणी
आरोपीस कारावास व दंडाची शिक्षा
स्थानिक चिखली येथील रहीवासी कोकीळा नामदेव खरे यांनी बालाजी अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि., चिखली यांचे कडून घेतलेल्या थकीत कर्जाच्या भरण्यापोटीे यांनी दि.६/४/१७ रोजी संस्थेस इंडियन ओव्हरसिस बँक चिखली या बँकेचा धनादेश क्र.९२९८०१ रु. १,५३,०००/- चा दिला होता.
सदर धनादेश खात्यात पुरेसा निधी नसल्यामुळे न वठवता परत आल्यामुळे बालाजी अर्बन संस्थेने त्यांच्याविरुध्द प्रथम १३८ अन्वये फिर्याद दिवाणी व फौजदारी न्यायालयास चिखली येथे दाखल केली होती. सदर प्रकरणामध्ये दि. ६/५/२०२५ रोजी न्याधयाधिश एच.डी. देशिंणे साहेब दिवाणी फौजदारी न्यायालय चिखली यांनी या दाव्यामध्ये संस्थेच्या बाजुने महत्वपूर्ण निकाल देतांना १३८ एन.आय.अॅक्ट १८८१ च्या गुन्ह्याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७६ च्या कलम २५५/२ नुसार आरोपी कोळीळा खरे यांना दोन महिने साधा कारावास आणि ३,०६,०००/- रोख दंडाची शिक्षा सुनावली आहे.
तसेच आरोपीने फिर्यादी संस्थेस दंडाची रक्कम न दिल्यास वरील प्रमाणे दोन महिने व एक महिना अतिरिक्त असे एकूण तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल असे आदेशात नमुद केले आहे.
सदर प्रकरणामध्ये फिर्यादी संस्थेकडून अॅड. एस.पी.चव्हाण यांनी सर्व काम पाहिले.
