
“छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक रथ मिरवणूक दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे संपन्न!”
आज दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त इतिहासात प्रथमच छत्रपती संभाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीची भव्य रथ मिरवणूक केंद्रीय मंत्री नामदार मा.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.

ही रथयात्रा दि.९ मे २०२५ रोजी नाशिक येथून सुरू झाली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जयपूर आणि दिल्ली असा प्रवास करत आज ती महाराष्ट्र सदन येथे पोहोचली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 300 नागरिकांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

या ऐतिहासिक प्रसंगी सायंकाळी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर ही अश्वारूढ मूर्ती पुन्हा नाशिक येथे पूजन करून स्थापित केली जाणार आहे.

ही रथयात्रा म्हणजे केवळ श्रद्धेचा नव्हे तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा जल्लोष आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, बाणेदारपणा आणि आत्मबलिदान याची आठवण करून देणारा हा कार्यक्रम पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल.
