Skip to content
June 29, 2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • VK
  • Youtube
  • Instagram

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • VK
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Main Banner
    • Free
      • Tab, Slider & Trending
      • Editor, Slider & Tab
      • Slider & Trending
      • Slider, Editor & Tab
    • Pro
      • Tab, Slider & Trending
      • Tab, Slider & Editor
      • Slider, Editor & Trending
      • Slider & Trending
      • Slider & Tab
      • Slider & Editor
      • Carousel
  • Post Layouts
    • Wide Layout
      • Content – Primary Sidebar
      • Primary Sidebar – Content
      • Content Only
    • Narrow Layout
      • Content – Primary Sidebar
      • Primary Sidebar- Content
      • Content Only
  • Archive Style
    • Free
      • List Layout
      • List right layout
      • Full Title After Image
      • Full Title Before Image
    • Pro
      • 2 Column Grid
      • 3 Column Grid
      • List Layout
      • List Right Layout
      • List Alternative
      • Masonry
      • Full Title After Image
      • Full Title Before Image
      • Full Title Over Image
  • All Demos
    • Free
      • MoreNews
      • Sport
      • Fashion
      • Classic
      • Food Recipe
      • Travel
      • Crypto News
      • Real Estate
      • Local Business
      • Beauty Studio
      • Architecture Blog
      • Esports
      • Arabic News
      • China Today
    • Pro
      • MoreNews Pro
      • Sport Pro
      • Fashion Pro
      • Classic Pro
      • Food Recipe Pro
      • Travel Pro
      • Online Mag Pro
      • Crypto News Pro
      • Fitness Pro
      • Arabic News Pro
      • China Today Pro
  • Docs
    • Blog
    • 1000+ Starter Template
    • 15+ Pro Themes
    • Elementor News Addons
    • Gutenberg Site Builder
    • Demo Site Importer
    • WP Post Author
  • Learn
    • Setup DeepSeek AI Locally
    • WP Website Setup with InstaWP
    • Hindi News Website Tutorials
    • Build an Accessible News Site
    • Fast News Theme – CentralNews
    • Wix vs WordPress
  • Community
  • Upgrade
Live
  • Home
  • Ravikant Tupkar बळीराजासाठी रविकांत तुपकरांचा वाढदिवशी एल्गार!अंगणातच कुटुंबीयांसह लाक्षणिक अन्नत्याग
  • Home
  • ताज्या बातम्या
  • बुलडाणा

Ravikant Tupkar बळीराजासाठी रविकांत तुपकरांचा वाढदिवशी एल्गार!अंगणातच कुटुंबीयांसह लाक्षणिक अन्नत्याग

ccn news 2 months ago 1 min read
IMG-20250514-WA0041.jpg
FacebookX

बळीराजासाठी रविकांत तुपकरांचा वाढदिवशी एल्गार! (फोटो)
अंगणातच कुटुंबीयांसह लाक्षणिक अन्नत्याग : शेतकरी प्रश्नावर वेधले शासनाचे लक्ष : शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा : राज्याच्या कानाकोपऱ्यातून कास्तकार आले भेटीला

………………………………….
राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांसाठी वाढदिवस म्हणजे जल्लोषाची मोठी पर्वणीच असते. बडेजाव आणि थाटमाट काही औरच असतो. मात्र, शेतकरी नेते रविकांत तुपकर त्याला अपवाद ठरले आहेत. वाढदिवशी कुठलाही आनंदोत्सव साजरा न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्या घराच्या अंगणातच तुपकर यांनी पत्नी, आई, वडील, मुले आणि बहिणींसह १३ मे रोजी जन्मदिनी लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन केले. जगाच्या पोशिंद्यासाठी केलेला हा एल्गार अधिक तीव्र करण्यासाठी शेतकरीदेखील मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी दाखल झाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनही कास्तकार आल्याने या आंदोलनाला मोठी ताकद मिळाली. या आंदोलनाच्या माध्यमातून तुपकर कुटुंबीयांनी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
वाढदिवस हा आनंदाचा उत्सव म्हणून मनवला जातो, पण रविकांत तुपकर यांनी वाढदिवशी कुठलेही हारतुरे, सत्कार न स्वीकारता आजचा जन्मदिन शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी समर्पित केला. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी जगणारा नेता म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. शेतकऱ्यांवर त्यांनी अक्षरश: जीव ओवाळून टाकला आहे. ‘जगेल तर शेतकऱ्यांसाठी, मरेल तर शेतकऱ्यांसाठी’ या ध्येयाने जगणारे रविकांत तुपकर हे वाढदिवस साजरा न करता विविध मागण्यांसाठी अन्नत्यागाला बसले. वाढदिवशी आंदोलन करणारे रविकांत तुपकर हे राज्यभरातून एकमेव नेते ठरल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहेत.
पहलगाम हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. त्यातच दिवसाला दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतमालाला भाव नाही, शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबला आहे. बँकांनी होल्ड लावले आहेत, सक्तीने कर्ज वसुली सुरू आहे. अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. शेतकरी प्रचंड अडचणीतून जातोय, तरुण अस्वस्थ आहेत, देशातील वातावरण अस्थिर आहे अशा पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करण्याचा विचारही मनाला पटत नसल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हित जपण्यासाठी आपण आजचा हा लढा उभारल्याचे रविकांत तुपकर शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.

या मागण्यांकडे वेधले लक्ष

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, १००% पीकविम्याची रक्कम अदा करावी, सोयाबीन-कापसाला भावफरक द्यावा, बँकांनी खात्यांना लावलेला होल्ड काढावा, सक्तीची कर्जवसुली थांबवावी, शेती पिकांना संरक्षण म्हणून कंपाऊंड लावावे, उसाला एकरकमी, दूध, कांद्याला अनुदान मिळावे , शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने पीककर्ज वाटप व पीक कर्ज मर्यादा वाढवावी,शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, रखडलेले अनुदान मिळावे द्यावी, या मागण्यांकडे तुपकरांनी लक्ष वेधले.

रात्री बारापर्यंत चालले आंदोलन

जन्मदिनाच्या पर्वावर रविकांत तुपकर यांच्यासह कुटुंबीयांनी आज सकाळी नऊ वाजेपासून सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन रात्री बारा वाजेपर्यंत चालले. शेतकरी संघटने नेते नामदेवराव जाधव व दलितमित्र शेषराव पाटील सावळे यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांची प्रतिमा व भारत मातेच्या पूजनाने सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रगीतही झाले.

दिवसभर शेतकरी प्रश्नांवर विचारमंथन

रविकांत तुपकर यांनी उपोषणामागची भूमिका विशद केली. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. काही मान्यवरांनीही पाठिंबा दर्शविला. आपले मनोगत व्यक्त केले. काही शेतकऱ्यांनीही विचार मांडताना रविकांत तुपकर यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. तुपकरांच्या कार्यावरही प्रकाश टाकण्यात आला. युवा शेतकऱ्यांचीही मोठी गर्दी उसळली होती. शेतकरी प्रश्नांवर दिवसभर विचार मंथन करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. पाठिंबा देण्यासाठी दिवसभर रिघ लागली होती.

शहिदांना आदरांजली, ‘जय जवान, जय किसान’चा नारा
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ निष्पाप नागरिकांसह शहिद जवानांना यावेळी आदरांजली अर्पण करण्यात आली. शेतकरी आणि सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून ‘जय जवान, जय किसान’चे नारे देण्यात आले.

मंडप भिजला, पण आंदोलन नाही थांबले

वाढदिवसाच्या निमित्ताने आंदोलनात्मक भूमिका घेणे, ही पहिलीच वेळ असल्याने हे अन्नत्याग आंदोलन लक्षवेधी ठरले. सकाळी पडलेल्या पावसाने मंडप ओला झाला, तरीसुद्धा पावसातच सकाळी ९ वाजेपासून तुपकर कुटुंबीयांनी अन्नत्याग सुरू केले.

कुटुंबातील पाठीराखे

पत्नी शर्वरी तुपकर, वडील चंद्रदास तुपकर, आई गीताताई तुपकर, बहीण राधा तुपकर, बहीण मीना गवते, मुलगी यज्ञजा, मुलगा देवरत यांनी अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांसोबतच कुटुंबातील हे सदस्य तुपकरांची खरी ढाल म्हणून पाठीशी असल्याचे यावेळी दिसून आले.

Continue Reading

Previous: Ravikant Tupakar News: सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी
Next: Ch Sambhaji Maharaj “छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक रथ मिरवणूक दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे संपन्न!”

Related Stories

IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • VK
  • Youtube
  • Instagram

Trending News

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन…. IMG-20250603-WA0024.jpg 1

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

4 weeks ago
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन…. IMG-20250603-WA0024.jpg 2

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

4 weeks ago
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन…. IMG-20250603-WA0024.jpg 3

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

4 weeks ago
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन…. IMG-20250603-WA0024.jpg 4

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

4 weeks ago
श्री संत गजानन महाराज यांची पालखीचे पंढरपूर करिता प्रस्थानश्रींच्या पालखीचे हे ५६ वे वर्षपालखी सोबत भजनी दिंडी, अश्वासह ७०० वारकरी IMG-20250603-WA0006.jpg 5

श्री संत गजानन महाराज यांची पालखीचे पंढरपूर करिता प्रस्थानश्रींच्या पालखीचे हे ५६ वे वर्षपालखी सोबत भजनी दिंडी, अश्वासह ७०० वारकरी

4 weeks ago

You may have missed

IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
IMG-20250603-WA0024.jpg
1 min read
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धार्मिक

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे” आयोजन….

ccn news 4 weeks ago
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • VK
  • Youtube
  • Instagram
CCN News Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.