
ब
रविकांत तुपकरांकडून जळून खाक झालेल्या घरांची,व नुकसानीची केली पाहणी..शासनाने पाचही कुटुंबाना भरीव मदत करावी.. रविकांत तुपकरांची सरकारकडे मागणी..
बुलढाणा
शॉर्ट सर्किट मुळे बुलडाणा शहरातील मिर्झा नगर परिसरातील पाच घरे जळून खाक झाली..या सर्व घरांमधील संपूर्ण सामान भांडे कुंडे दागिने, पैसेही जळून खाक झालेत. हे कपडे व चप्पल बूट चे छोटे व्यवसायिक आसल्यामुळे घरात कपड्यांचा व चप्पल बूट चा मोठा ठेवलेला होता, तोही जळून गेल्याने हे सर्व परिवार रस्त्यावर आलेत. सूदैवाने जिवीतहानी झाली नाही पण घरं मात्र उध्वस्त झालीत.
या कुटुंबांची शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी भेट घेऊन आधार दिला महावितरण चे अधीक्षक अभियंता, तहसीलदार यांचेशी फोन वरून चर्चा केली. तात्काळ पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या. शासनाने विशेष बाब म्हणून या कुटुंबांना भरीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली.
