
अधिग्रहित केलेल्या विहीर मालकांना थकीत रक्कम अदा करण्यासाठी आ. महालेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे..
दिनांक 6 मे रोजी पंचायत समिती कार्यालय चिखली, येथे आमदार सौ. श्वेताताई विद्याधर महाले पाटील यांचा चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेशी “लोकसंवाद” पार पडला. या लोकसंवादासाठी आणि या लोकसंवादातून आपले गाऱ्हाणे,, तक्रारी आपल्या आमदारांच्या कानावर घालण्यासाठी संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघातून नागरिक जमले होते. या लोकसंवाद कार्यक्रमांमध्ये काही गावातील पाणी टंचाई निवारणार्थ सन 2023 व 24 मध्ये विविध उपाय योजना अंतर्गत करण्यात आलेल्या अधिग्रहित विहिरींचे मालकही आपली तक्रार घेऊन आले होते.

चिखली विधानसभा मतदारसंघ अंतर्गत चिखली तालुक्यातील 95 विहिरी पाणीटंचाई निवारणार्थ सन 2023 व 2024 मध्ये अधिग्रहित केलेल्या होत्या, परंतु सदर अधिग्रहित विहिरींचे 78 लक्ष रुपये बिल संबंधित विहीर मालकांना दोन वर्षापासून मिळालेले नाही. तरी सरकारकडून आपली ही येणे असलेली रक्कम आपल्याला मिळावी म्हणून या गावातील विहीर मालकांनी आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांना विनंती केली होती.
या लोकसंवाद कार्यक्रमांमध्ये दिलेल्या शब्दांनुसार त्याच दिवशी आमदार सौ श्वेता ताई विद्याधर महाले पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या विहीर मालकांना त्यांच्या अधिग्रहित केलेल्या विहिरीचा मोबदला म्हणून त्यांची बाकी असलेली रक्कम त्वरित मिळावी यासाठी पत्राद्वारे विनंती केली. आणि त्यांनी केलेल्या या पत्रव्यवहाराला उत्तर म्हणून माननीय मुख्यमंत्री यांनी लवकरच या विहिरींच्या विहीर मालकांना त्यांची थकीत रक्कम अदा करण्यात येईल असे आश्वासित केले आहे.
लोकसंवाद कार्यक्रमांमध्ये आमदार ताईंनी विविध लोकांना त्यांच्या तक्रारी ऐकून त्या तक्रारी सोडवण्यासाठी जो शब्द दिला तो शब्द पाळणारा लोकप्रतिनिधी चिखली तालुक्याला मिळाला या शब्दात आमदार सौ श्वेताताई यांचे कौतुक होत आहे.