
भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत पुन्हा सेवेवर बोलावण्याची माजी सैनिकांनी व्यक्त केली इच्छा…
शत्रूचा पराभव करण्यासाठी माजी सैनिक सज्ज…
बुलढाणा प्रतिनिधी -भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य स्थिती कायम आहे..

त्यामुळे युद्धासाठी ‘आम्हालाही बोलवावे, अशी विनंती सैनिक बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी केली आहे.. सैन्य दलानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.. तर ऑपरेशन पराक्रम, ब्लू स्टार, कारगिल युद्धाच्या वेळी थेट युद्धभूमीवर लढण्याचा अनुभव आहे..

पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती नंतर आता देश सेवेसाठी पुन्हा एकदा माजी सैनिक सज्ज झाले आहेत..अनेक लढाईत सक्रिय सहभाग घेतलेले बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पुन्हा एकदा सीमेवर आपली सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे..