

शेगांव
विदर्भची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे, उद्या सोमवारी सकाळी सात वाजता आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्याकरिता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यंदा पालखीचे हे 56 वे वर्षे असून 700 वारकरी 250 पताकाधारी 250 टाळकरी आणि 200 सेवाधारी सहभागी होणार आहेत. श्री संत गजानन महाराजांची पालखी अंदाजे 33 दिवसांत 700 किलोमीटरचे अंतर पायी चालत चार जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. सहा जुलै रोजी पंढरपूरच्या आषाढी एकादशीमध्ये सहभागी होत परिक्रमेमध्ये देखील सहभाग घेणार आहे.

विदर्भची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे उद्या सकाळी सात वाजता आषाढी एकादशी च्या
सोहळ्यात सहभागी होण्याकरिता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. हे पालखीचे 56 वे वर्षे आहे. श्रींच्या पालखीचा पंढरपूर पायदळ प्रवास दिनांक 2 जून रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे रात्रीच्या मुक्कामी राहणार आहे. परतीच्या प्रवास हा 10 जुलै रोजी सुरू होणार असून 31 जुलै रोजी शेगाव येथे आगमन होणार आहे.

