
*हज यात्रेनिमित्त शे अनिस यांचा सपत्नीक सत्कार*
चिखली
हज ही मुस्लिम लोकांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र शहरी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी असा कुराणामध्ये आदेश आहे. ही एक पवित्र यात्रा समजली जाते त्यामुळे जीवनात एकदा तरी हज यात्रा करावी अशी प्रत्येक मूलसमानाची इच्छा असते. अशीच हज यात्रेची इच्छा अनेक काळापासून उराशी बाळगणाऱ्या शेख अनिस व त्यांच्या धर्मपत्नी वजीराबी शे अनिस हे दाम्पत्य येत्या 24 मे रोजी हज यात्रेसाठी रवाना होत आहे

भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस सौ वजीरा बी शेख अनिस हे येत्या 24 मे रोजी हजला जाणार आहेत.
आमदार सौ श्वेता ताई महाले यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे शेख अनिस आपल्या कार्यामध्ये कुठेही जात धर्म आड न आणता मानवता हीच जात व माणुसकी हाच धर्म या न्यायाने काम करत असतात.
हज यात्रेनिमित्त svm परिवाराच्या वतीने गोपाल तुपकर,माधव मोरमपल्ले,मंगेश पळसकर,शेख मुज्जमिल,मनोज रूपारेलीया,गणेश गावंडे, संजय जामदार,सुनील जामदार,राजेश मेहरा,प्रफुल्ल देशमुख, अरुण ठेंग,रफीक भाई, धनंजय शर्मा, प्रशांत करंडे , अमोल जाधव , सत्कार केला या वेळी सर्व परिवारातील महिला पुरुष हजर होते.
या सत्कारामुळे एस व्ही एम परिवाराने सर्वधर्मसमभावतेचा संदेश आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे