
वीज खांबावरील ॲल्युमिनियम तार चोरणारे गजाआड! ‘एलसीबी’ची कारवाई
बुलढाणा:
इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियम चे तार चोरणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. यांमधील दोघांना एका दिवसाची पोलिस कोठडी तर एकाला न्यायालयिन कोठडी सुनावली आहे.
पोलिस स्टेशन जळगांव जामोद येथे ईलेक्ट्रीक पोलवरील अॅल्युमिनीयम तार चोरी झाल्याप्रकरणी भारतीय विद्युत कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखे कडून समांतर तपास करुन गुन्ह्याची यशस्वी उकल करण्यात आली. या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या आरोपीमध्ये संतोष पावरा, बेलरसिंग पावरा, , शेख सईद रा. पिंपळगांव काळे, ता. जळगांव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडून वाहन ताब्यात घेतले आहे त्याची किंमत अंदाजे 3 लाख जप्त केले आहे. चोरीस गेलेली अॅल्युमिनीयम तार 35 किलो 4 हजार 620 रुपयाचा असा एकूण 3 लाख 4 हजार 620 चा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर गुन्ह्यामध्ये वरील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात आणखी ईतर आरोपी आहेत अगर कसे याचा शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. जळगांव जामोद यांचे कडून करण्यात येत आहे.
न्यायालयासमोर हजर केले असता गुन्ह्यात अटक आरोपीं पैकी 2 आरोपींचा 1 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला असून, उर्वरीत एकाची मॅजिस्टेड कस्टडीमध्ये जिल्हा कारागृहात रवानगी केली. पोलीस कस्टडी रिमांड अंतर्गत असलेले आरोपी कडून ईतर ठिकाणच्या विद्युत तार चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. त्या प्रमाणे तपास सुरु आहे.
अटक आरोपींनी पो.स्टे. जळगांव जामोद हद्दीत 3 विवीध ठिकाणी ईलेट्रीक पोलवरील अॅल्युमिनीयम तारेची चोरी केल्याची पोलीसांना कबुली दिली आहे. त्यातील उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करण्यात येत आहे. आरोपी सरकारी कामांमध्ये ईलेट्रीक पोलचे काम सुरु असलेल्या ठिकाणी पडून असलेल्या अॅल्युमिनीयम तारांची चोरी करुन, सदरचे तार भंगार दुकानदारांना विकत होते.
सदरची कारवाई पोनि अशोक लांडे यांचे नेतृत्वात सपोनि. यशोदा कणसे, पोहेको, एजाज खान, गणेश पुरुषोत्तम पाटील, पोकों. गोपाल तारुळकर, चालक पोकों. शिवानंद हेलगे यांनी केली.
