
मा. मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते कार्यकर्त्यांसाठी हक्काच्या घराचे भूमिपूजन:
आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी हक्काचे घर म्हणून भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा कार्यालय बांधकामाचे भूमिपूजन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात झाले.

या सोहळ्यात मार्गदर्शन करताना मा. मुख्यमंत्री म्हणाले की, जसे कुटुंबासाठी घर महत्त्वाचे असते तसे कार्यकर्त्यांसाठी कार्यालय महत्त्वाचे असते. तेच हे घर आहे. येथे जुने, नवे, सर्व कार्यकर्ते आहेत. मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा हा पारंपरिक भारतीय जनता पक्षाचा गड आहे. या ठिकाणी जनसंघापासून खूप जुने काम आहे. बुलढाणा जिल्ह्यात नळगंगा, पैनगंगा हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्याचा फायदा जिल्ह्याला होणार आहे.


या वेळी प्रदेश उपाध्यक्ष भाजप आ. श्री. चैनसुखजी संचेती, आ. श्री. वसंतरावजी खंडेलवाल, श्री. सुखदेवजी काळे माजी खासदार, श्री. तोतारावजी कायंदे माजी आमदार, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. सचिनजी देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. विजयराज शिंदे, ॲड. श्री. विजयजी कोठारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य, हभप श्री. प्रकाश महाराज जवंजाळ प्रदेश कार्यकारिणी सदस्य, श्री. योगेंद्रजी गोडे, श्री. विनोद वाघ या मान्यवरांसह भाजपाचे सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा व तालुका पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष व कार्यकारिणी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख, आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.