
संतोषी आगरकर हिला पेटेंट कार्यालय, भारत सरकार व्दारा डिझाईनसाठी नोंदणी प्रमाणपत्र बहाल
चिखली (प्रतिनिधी)
संतोषी आगरकर, हिला Adjustable Wash Basin च्या डिझाईनसाठी पेटेंट कार्यालय भारत सरकारचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले. सदर डिझाईन ही दिव्यांग व्यक्तीसाठी असून व्याची संरचना कमी खर्चाची, कमी देखभाल, स्वदेशी बनावटी, पर्यावरण पुरक व सुरक्षित अशी आहे.

कु. संतोषी आगरकर हीने दिव्यांग व्यक्तीना दररोज हाताची स्वच्छता राखताना येणाऱ्या अडचणीच चिकित्सक अभ्यास व निरिक्षणातून या वॉश बेसिन ची डिझाईन तयार केली आहे.

ही डिझाईन समाजातील दिव्यांग व्यक्तीच्या दैनंदिन वापरासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. यापूर्वी ही तीने महत्वाच्या विषयासंबंधी डिझाईन तयार केले असून भविष्यातही विविध सामाजिक समस्यांचा अभ्यास करून त्यावर नवीन्यपूर्ण डिझाईनव्दारे उपाययोजना करण्याचा तीचा मानस आहे. हया यशाचे श्रेय तीने मार्गदर्शक अभियंता श्री अंजिक्य कोत्तावार व अँड. सौ. कविता आगरकर यांना दिले.
कु. संतोषी ही अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, चिखली चे माजी प्राचार्य डॉ. संतोष व्ही. आगरकर यांची कन्या आहे. तीच्या हया यशाबद्दल प्राचार्य डॉ. विजेश मूनोत