
स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे यांच्या अध्यक्षतेखाली शालांत परीक्षा इयत्ता दहावी मध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या एकूण 61 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमाला व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रेमराज भाला, संस्थेचे संचालक निमावत दादा, सुनीलजी लाहोटी, सुहासजी जामदार, सहदेवराव सुरडकर, विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले, उपप्राचार्य भगवान आरसोडे, पर्यवेक्षक श्रीपाद दंडे, प्रकाश तायडे, लक्ष्मीकांत शेटे उपस्थित होते. दरवर्षी विद्यालयामध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न होत असतो याही वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण 408 विद्यार्थी बसले असता 397 विद्यार्थी उत्तीर्ण झाले पैकी 227 विद्यार्थी प्राविण्यश्रेणीमध्ये आले असून त्यामध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेणारे एकूण 61 विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने आज रोजी करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले सर यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विद्यालय राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थी आणि पालक यांना करून दिली. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रेमराज भाला यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले सोबतच येणाऱ्या काळामध्ये अथक परिश्रम करून आपण याहीपेक्षा अधिक यशस्वी व्हावे याकरिता सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक प्रदीप हाके, मुकेश भवर, ज्ञानेश्वरी औटी तर आभार प्रदर्शन विनोद महाजन यांनी केले सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सर्व शिक्षक बंधू भगिनी गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्ग 10 चे वर्गशिक्षक बंधू-भगिनी तसेच विद्यालयाचे मुख्य लिपिक विनायक भालेराव, ज्योती भावसार, वैशाली जोशी, गणेश अंभोरे, विनायक गिऱ्हे, गोपालकृष्ण कुलकर्णी श्रीकृष्ण वाघ, दीपक जाधव,सुभाष नेवरे, तुळशीदास चांगडे, तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले
