
*बिहार पाटणा येथे चालू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम 2025 मध्ये पियुष कोल्हे ला मिळाले सुवर्णपदक *
बोरगाव काकडे ( वार्ताहर )
खेलो इंडिया युथ गेम 2025 साठि बिहार राज्यातील पाटणा (राजगीर )येथे सुरू असलेल्या 11 मे ते 15 मे दरम्यान चालु आसलेल्या तलवारबाजीया खेळामध्ये ईप्पी या प्रकारात सांघीक खेळामध्ये पियुष संजय कोल्हे यांनी सुवर्णपदक प्राप्त केले आहे …..
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील धोडप गावचे शेतकरी कुटुंबात जन्मलेला संजय कोल्हे यांचा पियुष हा सुपुत्र असुन
चिखली सारख्या छोट्या शहरात तलवार बाजीचे प्रशिक्षण पूर्ण करून आज जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे पियुष च्या कामगिरीमुळे बुलढाणा जिल्ह्याचे चिखली तालुक्याचे नावआज मोठे झाले आहे पियुष च्या यशा मागे प्रशिक्षक अक्षय गोलांडे सर यांचे मार्गदर्शन व कठोर मेहनत व जिल्हा तलवारबाजी असोशियन व आई वडील यांनी पियुषला केलेले सहकार्य व मार्गदर्शन हि खरी जमेची बाजू आहे तरी पियुष च्या यशामुळे सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे
